पोहे रेसिपी
पोहे
साहित्य:
- जाड पोहे – 1 कप
- कांदा – 1 मध्यम, बारीक चिरलेला
- हिरवी मिरची – 2, चिरलेल्या
- मोहरी – ½ टीस्पून
- जिरे – ½ टीस्पून (R A Jeera)
- हळद – ¼ टीस्पून
- कढीपत्ता – 6-7 पाने
- साखर – ½ टीस्पून
- मीठ – चवीनुसार
- शेंगदाणे – 2 टेबलस्पून
- लिंबू रस – 1 टेबलस्पून
- तेल – 2 टेबलस्पून
- कोथिंबीर – सजावटीसाठी
कृती:
- पोहे स्वच्छ धुवून 5 मिनिटे बाजूला ठेवावेत.
- कढईत तेल गरम करून त्यात शेंगदाणे, मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिरवी मिरची घालून परतावे.
- कांदा घालून तो पारदर्शक होईपर्यंत परतावा.
- हळद, मीठ, साखर घालून मिसळा.
- धुतलेले पोहे घालून व्यवस्थित हलवा. झाकण ठेवून 2 मिनिटे शिजवा.
- शेवटी लिंबू रस आणि कोथिंबीर टाका. गरम गरम सर्व्ह करा.