उपमा
साहित्य:
- रवा (सूजी) – 1 कप
- कांदा – 1 मध्यम, बारीक चिरलेला
- हिरवी मिरची – 1-2
- मोहरी – ½ टीस्पून
- जिरे – ½ टीस्पून (R A Jeera)
- कढीपत्ता – 6-7 पाने
- हळद – ¼ टीस्पून
- मीठ – चवीनुसार
- पाणी – 2.5 कप
- साखर – ½ टीस्पून (ऑप्शनल)
- तेल – 2 टेबलस्पून
- लिंबाचा रस – 1 टीस्पून
- कोथिंबीर – सजावटीसाठी
कृती:
- रवा कोरडा थोडासा परतून बाजूला ठेवा.
- दुसऱ्या पॅनमध्ये तेल गरम करून मोहरी, जिरे, मिरची, कढीपत्ता, कांदा परता.
- हळद, साखर आणि मीठ घालून मिक्स करा.
- त्यात 2.5 कप उकळतं पाणी घाला.
- पाणी उकळल्यावर त्यात थोडं थोडं करत रवा घाला व ढवळा.
- झाकण ठेवून 2-3 मिनिटं शिजवा.
- शेवटी लिंबाचा रस आणि कोथिंबीर टाका. गरम गरम उपमा तयार!