बटाटा पराठा
साहित्य:
- गव्हाचं पीठ – 1 कप
- उकडलेले बटाटे – 2 मध्यम (मॅश केलेले)
- बारीक चिरलेली हिरवी मिरची – 1
- कोथिंबीर – 1 टेबलस्पून
- आले किसलेले – 1/2 टीस्पून
- R A गरम मसाला – 1/2 टीस्पून
- मीठ – चवीनुसार
- तेल/तूप – भाजण्यासाठी
कृती:
- गव्हाचं पीठ मळून बाजूला ठेवा.
- बटाट्याच्या मिश्रणात मिरची, कोथिंबीर, आले, मसाला व मीठ घालून सारण तयार करा.
- पिठाचा गोळा लाटून त्यात सारण भरून पराठा तयार करा.
- तव्यावर खरपूस भाजून दही किंवा लोणच्यासोबत सर्व्ह करा.