वडापाव
साहित्य:
- उकडलेले बटाटे – 3 मध्यम
- हिरव्या मिरच्या-आले-लसूण पेस्ट – 1 टेबलस्पून
- मोहरी – 1 टीस्पून, कढीपत्ता – 6-7 पाने
- हळद – 1/2 टीस्पून
- R A गरम मसाला – 1 टीस्पून
- कोथिंबीर – 2 टेबलस्पून (बारीक चिरलेली)
- बेसन – 1 कप
- ओवा – 1/2 टीस्पून, मीठ – चवीनुसार
- चिमूटभर बेकिंग सोडा (ऐच्छिक)
- तेल – तळण्यासाठी
- लसूण पाकळ्या – 6-7
- R A लाल तिखट – 1 टेबलस्पून
- R A खोबर लसूण चटणी – 1 टीस्पून
- पाव – 6
- तळलेली मिरी / भजी / तळलेली हिरवी मिरची – ऐच्छिक
कृती:
- कढईत तेल गरम करून मोहरी, कढीपत्ता, मिरची-आले-लसूण पेस्ट घालून परतून घ्या.
- त्यात हळद, R A बटाटावडा मसाला, मीठ घालून हलवून उकडलेले बटाटे मॅश करून टाका.
- लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून मिक्स करा.
- गोळे करून ठेवा.
- बेसनात हळद, ओवा, मीठ, चिमूटभर सोडा घालून पाणी टाकून घट्टसर पीठ तयार करा.
- 10 मिनिटे झाकून ठेवा.
- तयार बटाट्याचे गोळे पीठात बुडवून गरम तेलात सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.
- किचन पेपरवर काढा.
- लसूण, लाल तिखट, R A खोबर लसूण चटणी, मीठ एकत्र वाटून कोरडी चटणी तयार करा.
- पाव मधून कापून त्यात लसूण चटणी लावा.
- मधे वडा ठेवून वरून थोडी चटणी भुरभुरा.
- तळलेली मिरचीसह गरमागरम सर्व्ह करा.