गुलाबजाम
लागणारे साहित्य:
- R A गुलाबजाम मिक्स – 1 कप (सुमारे 200 ग्रॅम)
- दूध – सुमारे 5-6 टेबलस्पून (गरजेनुसार)
- तेल/तूप – तळण्यासाठी
साखर पाकासाठी:
- साखर – 2 कप
- पाणी – 1.5 कप
- वेलदोडा पूड – 1/2 टीस्पून
- केशर – काही धागे (ऐच्छिक)
कृती:
- एका भांड्यात R A गुलाबजाम मिक्स घ्या आणि त्यात थोडं-थोडं दूध घालत मऊसर गोळा मळा.
- गोळा 5 मिनिटं झाकून ठेवा.
- नंतर त्याचे छोटे, गुळगुळीत आणि तडे न गेलेले गोळे बनवा.
- मध्यम आचेवर तूप किंवा तेल गरम करा आणि हे गोळे हलक्या हाताने गडद सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्या.
- दुसऱ्या भांड्यात साखर आणि पाणी उकळून पाक तयार करा. त्यात वेलदोडा पूड आणि केशर घालून हलवून घ्या.
- गरम गुलाबजाम गरम साखर पाकात 1-2 तास भिजवून ठेवा.
- गरम किंवा थंड सर्व्ह करा.