व्हेज पुलाव
साहित्य:
- बासमती तांदूळ – 1 कप
- मिक्स व्हेज (गाजर, बीन्स, वाटाणा, फ्लॉवर) – 1 कप
- कांदा – 1 मध्यम, पातळ चिरलेला
- हिरवी मिरची – 2, चिरून
- आले-लसूण पेस्ट – 1 चमचा
- तूप/तेल – 2 टेबलस्पून
- लवंग – 2
- तमालपत्र – 1
- दालचिनी – 1 तुकडा
- R A गरम मसाला – 1/2 चमचा
- आर ए व्हेज पुलाव मसाला
- मीठ – चवीनुसार
- पाणी – 2 कप
- हिरवी कोथिंबीर – सजावटीसाठी
कृती:
- तांदूळ स्वच्छ धुवून 20 मिनिटं भिजत ठेवा.
- कुकरमध्ये तेल गरम करून खडा मसाले (लवंग, दालचिनी, तमालपत्र) टाका.
- त्यात कांदा, हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट घालून परतवा.
- मग मिक्स व्हेज टाकून 2-3 मिनिटं परतून घ्या.
- नंतर भिजवलेले तांदूळ, R A गरम मसाला, मीठ व पाणी टाका.
- कुकरचे झाकण लावून 2 शिट्या द्या.
- वाफ सुटल्यावर उघडून हळूच ढवळा.
- वरून कोथिंबीर टाका.
सोबत कोशिंबीर:
- दही – 1 वाटी
- किसलेला काकडी – 1/2 कप
- चिरलेली मिरची व मीठ – थोडंसं
- सर्व साहित्य एकत्र करून गारगार कोशिंबीर सर्व्ह करा.