मटण रस्सा
साहित्य:
- मटण – 500 ग्रॅम (साफ करून)
- कांदे – 3 मध्यम (पातळ चिरलेले)
- टोमॅटो – 1 मध्यम
- आले-लसूण पेस्ट – 1.5 टेबलस्पून
- दही – 2 टेबलस्पून
- तेल – 4 टेबलस्पून
- R A मटण मसाला – 2 टेबलस्पून
- आर ए गरम मसाला – 1 टेबलस्पून
- हळद – 1/2 चमचा
- मीठ – चवीनुसार
- पाणी – आवश्यकतेनुसार
- कोथिंबीर – सजावटीसाठी
कृती:
- तेल गरम करून त्यात कांदा खरपूस परतून घ्या.
- त्यात आले-लसूण पेस्ट, हळद व टोमॅटो टाका.
- थोडं शिजल्यावर दही व R A मटण मसाला घालून 2-3 मिनिटं भाजा.
- आता मटण घालून मध्यम आचेवर 8-10 मिनिटं परतून घ्या.
- नंतर पाणी घालून कुकरमध्ये 3-4 शिट्या द्या.
- प्रेशर सुटल्यानंतर रस्सा गडद हवा असेल तर थोडा वेळ उकळा.
- वरून कोथिंबीर टाकून गरम गरम भात/भाकरीसोबत सर्व्ह करा.