मटण बिर्याणी
साहित्य:
- मटण साठी:
- मटण – 500 ग्रॅम
- दही – 1/2 कप
- आले-लसूण पेस्ट – 1.5 टेबलस्पून
- R A बिर्याणी मसाला – 2 टेबलस्पून
- हळद, मीठ – चवीनुसार
- कांदा – 2 मोठे, तळलेले
- लिंबू रस – 1 टेबलस्पून
- भातासाठी:
- बासमती तांदूळ – 2 कप (30 मिनिटं भिजवलेले)
- तमालपत्र, लवंग, दालचिनी – प्रत्येकी थोडे
- मीठ – चवीनुसार
- इतर:
- तळलेला कांदा – सजावटीसाठी
- साजूक तूप – 2 टेबलस्पून
- केशर + दूध – थोडंसं
कृती:
- मटण सर्व साहित्यासोबत मॅरिनेट करून 1 तास ठेवा.
- कुकरमध्ये मटण शिजवून ठेवा (3-4 शिट्या).
- तांदूळ साजूक मसाल्यांच्या पाण्यात अर्धवट शिजवा.
- एका मोठ्या भांड्यात एक थर मटण, एक थर भात असा लावावा.
- वरून तूप, तळलेला कांदा, केशर दुध टाकून झाकण लावून 10 मिनिटं दम देऊन शिजवा.
- बिर्याणी तयार!