भडंग मसाला(Bhadang/Spicy Murmura)
साहित्य:
- मुरमुरे (फुरसाणाचे) – 4 कप
- तेल – 2 टेबलस्पून
- शेंगदाणे – 1/4 कप
- कढीपत्ता – 8-10 पाने
- सुकं खोबरं – 1 टेबलस्पून
- R A भडंग मसाला – 1.5 टेबलस्पून
- हिंग – 1 चिमूट
- साखर – 1/2 टीस्पून (ऐच्छिक)
- मीठ – चवीनुसार
कृती:
- मुरमुरे हलके गरम करून कुरकुरीत करून घ्या.
- कढईत तेल गरम करून शेंगदाणे, कढीपत्ता, हिंग, खोबरं परतून घ्या.
- नंतर R A भडंग मसाला, मीठ व साखर घालून मिश्रण करा.
- त्यात मुरमुरे घालून नीट ढवळा.
- पूर्ण थंड झाल्यावर हवाबंद डब्यात साठवा.