About Us
Recipes
Gallery
Contact
Rajma (राजमा)
मुख्य मसाले:
R A Chole Masala, Kasuri Methi
📋 साहित्य (3 ते 4 जणांसाठी):
राजमा (Red Kidney Beans) – 1 कप
कांदा – 2 मध्यम (बारीक चिरलेले)
टोमॅटो – 2 मध्यम (पेस्ट केलीले)
आलं-लसूण पेस्ट – 1 टेबलस्पून
हिरवी मिरची – 1 (चिरलेली)
हळद – ¼ टीस्पून
लाल तिखट – 1 टीस्पून
R A Chole Masala – 2 टीस्पून
Kasuri Methi – 1 टीस्पून
मीठ – चवीनुसार
तेल / तूप – 2 टेबलस्पून
बारीक चिरलेली कोथिंबीर – सजावटीसाठी
पाणी – आवश्यकतेनुसार
👨🍳 कृती:
राजमा धुवून रात्री भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी कुकरमध्ये मीठ टाकून 3-4 शिट्ट्या देऊन शिजवून घ्या.
कढईत तेल गरम करून त्यात चिरलेला कांदा टाकून सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.
नंतर आलं-लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची टाकून सुवास येईपर्यंत परता.
टोमॅटो पेस्ट घालून त्यात हळद, तिखट, R A Chole Masala आणि मीठ घालून मध्यम आचेवर मसाला परतून घ्या.
मसाला तेल सुटेपर्यंत परतून झाल्यावर त्यात शिजवलेला राजमा आणि त्याचे पाणी घाला.
झाकण ठेवून मध्यम आचेवर 10-15 मिनिटं उकळा. चवीनुसार पाणी कमी-जास्त करा.
शेवटी Kasuri Methi हाताने चुरडून घालावी आणि चांगलं मिक्स करावं.
कोथिंबीर घालून गॅस बंद करा.