Veg Dum Biryani (व्हेज डम बिर्याणी)
मुख्य मसाले:
R A Veg Pulav Masala, Kasuri Methi, Khada Masala (Akhand Khade Masale)
📋 साहित्य (4 जणांसाठी):
- भातासाठी:
- बासमती तांदूळ – 1½ कप (30 मिनिटे भिजवलेले)
- पाणी – 5 कप
- मीठ – 1 टीस्पून
- तेल – 1 टीस्पून
- R A Khada Masala – 1 टेबलस्पून (लवंग, तमालपत्र, दालचिनी, काळी मिरी, वेलदोडे)
- भाजीसाठी:
- गाजर – 1 मध्यम (फोडी करून)
- फरसबी – 10-12 (तुकडे)
- मटार – ½ कप
- बटाटा – 1 मध्यम (फोडी करून)
- कांदा – 2 मध्यम (पातळ स्लाईस)
- टोमॅटो – 1 मध्यम (बारीक चिरलेला)
- दही – ½ कप
- आलं-लसूण पेस्ट – 1 टेबलस्पून
- हिरवी मिरची – 1-2 (चिरलेली)
- हळद – ¼ टीस्पून
- लाल तिखट – 1 टीस्पून
- R A Veg Pulav Masala – 2 टीस्पून
- Kasuri Methi – 1 टीस्पून
- मीठ – चवीनुसार
- कोथिंबीर आणि पुदिना – बारीक चिरून
- तूप / तेल – 2-3 टेबलस्पून
- केशर – काही धागे (2 टेबलस्पून गरम दुधात भिजवलेले)
👨🍳 कृती:
१. भात शिजवणे:
पाण्यात तेल, मीठ आणि R A Khada Masala घालून उकळा.
त्यात भिजवलेले तांदूळ टाका आणि 80% शिजवून घ्या.
नंतर लगेच गाळा आणि थोडा थंड होऊ द्या.
२. भाजी तयार करणे:
कढईत तूप गरम करून कांदा कुरकुरीत होईपर्यंत तळा. अर्धा कांदा सजावटीसाठी बाजूला ठेवा.
उरलेल्या कांद्यात आलं-लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची परता.
टोमॅटो, हळद, तिखट, R A Veg Pulav Masala, आणि मीठ टाका.
मसाला तेल सुटेपर्यंत परता.
मग सर्व चिरलेली भाजी घाला आणि 5 मिनिटं परतून दही घालून मिक्स करा.
झाकण ठेवून भाजी 80% शिजवून घ्या.शेवटी Kasuri Methi आणि कोथिंबीर-पुदिना घालून मिक्स करा.
३. दम प्रक्रियेची तयारी:
एका जाड बुडाच्या भांड्यात थोडं तूप लावून अर्धा भात पसरवा.
त्यावर तयार भाजीचा थर द्या.
पुन्हा उरलेला भात टाका.
केशर दूध आणि तळलेला कांदा वरून घाला.
झाकण लावून वर जड वस्तू ठेवा किंवा कणकेचा सील करा.
मंद आचेवर 15 मिनिटे “दम” ला ठेवा.